kolhapuri jaggery, kolhapur jaggery, herbal jaggery, spiced jaggery, organic jaggery, कोल्हापुरी गुड, કોલ્હાપુરી ગોળ , mahalung - kolhapur jaggery , kolhapuri jaggery,

Kolhapur Jaggery
कोल्हापुरी गूळ
Kolhapur Jaggery
कोल्हापुरी गूळ
Go to content
Kolhapur jaggery is a very nutritious and healthy food. Kolhapur's climate is a blend of coastal and inland elements, has a favourable soil and agro ecological conditions. Kolhapur is situated at the banks of river Panchganga, which is called as Dakshin Kashi for its spiritual history.
Kolhapuri normal jaggery is having golden yellow & brown colour , a little bit harder in nature. Kolhapuri Organic jaggery is having light red-brown colour and soft in nature .
Sugarcane is grown throughout the kolhapur district. Jaggery produced without using "raw- finished white Sugar" in sugarcane juice known to be "Authentic Kolhapur Jaggery" never having White , Dark Black or Red Colours .
The jaggery season of river bank in Kolhapur district is from October to February months only. Due to change in climatic conditions in year 2023 , sugarcane crop yeild is affected in the region.
कोल्हापूरच्या गुळामध्ये मुबलक प्रमाणात मिनरल्स आणि अँटी-ऑक्सिडेंट घटक आढळले जातात. शरीरासाठी आवश्यक असलेल्या घटकांनी परिपूर्ण असा गूळ हा पदार्थ आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पूर्वेकडील भागात कोरडे तर पश्चिम घाटातील भागांत थंड हवामान असते.
भरपूर नद्या आणि सुपीक जमीन, जवळ असलेला अरबी समुद्र आणि सह्याद्रीच्या डोंगर रांगा यामुळे कोल्हापूर जिह्याचे हवामान कायमच  शेतीवर आधारित उद्योगांनसाठी वरदान ठरले आहे. कोल्हापूरचा गूळ हा म्हणूनच विशेष आहे.  कोल्हापूरचा साधा गूळ पिवळा किंचित तपकिरी रंगात आढळतो, हा कडक असतो. सेंद्रिय गुळ हा सौम्य ते गडद तपकिरी, तांबूस रंगाचा व मऊ असतो. कोल्हापूरचा गूळ पांढरा , लाल, गडद काळ्या या रंगात येत नाही. उसाच्या रसात साखर मिसळुन असा गूळ बनवला जातो .
कोल्हापूर जिल्ह्यातील नदी काठचा गूळ करायचा हंगाम ऑक्टोम्बर महिन्यापासून ते फेब्रुवारी महिन्यापर्यंत असतो. यंदा २०२३ साली पाऊस कमी झाल्याने, नदी काठाचा ऊस सोडल्यास इतर उसाची वाढ नीट झालेली नाही .
Sugarcane juice is acidic in nature, PH initially low at approximately 4.5–5.5 , Hydrated lime is added to the juice to raise the pH and to react with the impurities to form insoluble calcium organic compounds that can be removed. Hydrated lime should contain over 95% of ca(oh)2 without correct liming , good clarification cannot be expected.
Raw sugarcane juice is composed of a great number of organic and in-organic compounds , acids, salts etc. in varying amounts. The juice is an opaque liquid varying in colour form greenish-gray to dark green , and it carries suspended matter such as fine bagasse, gums , albumin , wax , particles of soil, sand , clay and muck.
The powder of okra roots and stems is used in purification of sugarcane juice . Ingredients used in jaggery preparations are important to define jaggery types for commercial basis. Kolhapur jaggery is available  as : - Normal Jaggery,   Organic Jaggery,   Herbal Jaggery and  Spiced Jaggery .
उसाची गाळपपूर्व स्वच्छता करणे आवश्यक आहे. उसावरील मातीचे कण, बुरशीचे अवशेष तसेच मेण यांचा रसाच्या प्रतीवर अनिष्ट परिणाम होतो. ऊस रसाचे  पी. एच. मूल्य किंवा सामू  गाळपा नतंर सुरुवातीला ४. ५ ते ५. ५ असतो , रसाची आम्लता कमी करून त्याचा सामू  ७ किंवा  ७ पेक्षा जास्त होण्यासाठी पारंपरिक पद्धतीने गूळ तयार करताना चुना वापर केला जातो.
चुन्याची निवळी घातल्यामुळे रसातील नत्रयुक्त टाकाऊ पदार्थ अविद्राव्य होऊन कार्बन संयुगे,  लवणे तयार होऊ लागतात . ऊस रसातील बगॅसचे लहान कण, पाचटाचे तुकडे, मातीचे कण इत्यादी कचरा काढून रस स्वच्छ करणे आवश्यक असते. भेंडीच्या रसाचा उपयोग रसातून मळी काढण्यासाठी करतात, जाड काळ्या मळीच्या रूपाने (ढोरमळी) रसावर तरंगू लागते. भेंडीच्या रसाचा उपयोग केल्याने रसाच्या शुद्धीकरणाला खूपच मदत होते , तयार होणाऱ्या गुळाचा नैसर्गिक रंग कायम राहतो. गूळ करताना वापरलेल्या विविध प्रकारच्या साधन सामुग्री मुळे, गुळाचे प्रकार ओळखले जातात. कोल्हापूर गुळाचे प्रामुख्याने प्रकार -  साधा गूळ , सेंद्रिय गूळ, मसाला गूळ  व (वनस्पती) हर्बल गूळ  असे आहेत .
kolhapur  Normal Jaggery
Rate Rs.  50 - 80 /- Per KG.
कोल्हापुरी साधा  गूळ

Normal Jaggery is prepared with help of  Sodium hydrosulphite (hydros) , Sulphur dioxide. It is used as a bleaching agent to get the golden color to jaggery.
साधा  गूळ , हा करताना केमिकल्सचा वापर करून प्रामुख्याने गुळाची चव, रंग आणि गुळ अधिक काळ टिकावा यासाठी केला जातो. गुळाला अधिक पिवळा रंग येण्यासाठी गंधक पावडर (सल्फरची पावडर) मिसळली जाते.
Rate Rs.  100 - 250 /- Per KG.

Organic Jaggery is prepared from sugarcane grown on organic farm  without use of  chemicals  for more than 4-5 years.
सेंद्रिय गुळाचा रंग तांबूस, तपकिरी (Light red-Light dark brown color) असतो. सेंद्रिय गुळ चविस अधिक गोड व स्पर्शास मऊ असतो. सेंद्रिय पद्धतीने ऊस शेती करून केमिकलच्या वापराविना तयार केलेल्या गुळाला  "सेंद्रिय गूळ" म्हणतात.
Rate Rs.  120 - 350 /- Per KG.
Herbal Jaggery is prepared by using natural ingredients like ginger , betel leaves , citron leaves, night jasmine leaves & flower's, black pepper leaves.
हर्बल गूळ तयार  करताना यामध्ये वनस्पतींच्या पानांचा, फुले, फळे  आणि मुळांचा वापर केलेला असतो.  उदा. खाऊचे पान, महाळुंग पान , पारिजातक पान व फुले , आले , मिरीचे पान  इ.
Rate Rs.  250 - 600 /- Per KG.

Spices contribute rich flavor to jaggery and   contributes major role in food safety and preservation. Spices have exhibited numerous health benefits in preventing and treating a wide variety of diseases also.
मसाला  गूळ हा विशिष्ट चवी करता , प्रसाद लाडू , मिठाई , औषध , चहा इ. करीता  अथवा पदार्थ टिकवण्यासाठी वापरला जातो.  उदा. मिरी , दालचिनी
The citron actually originated in the western most area of Asia, probably in the central Himalayan foothills where it was first domesticated.   ( Citrus Medica )
     महाळुंग वनस्पती मूळ भारतातील असून भारताच्या पूर्व भागातील वनांत, हिमालयाच्या पायथ्याजवळील प्रदेशात तसेच महाराष्ट्राच्या पश्‍चिम घाटात ही वनस्पती वाढलेली दिसून येते .
भारतीय वैदिक संस्कृतीमध्ये पण आदिशक्‍ती किंवा जगत्जननी या स्वरूपाच्या देवीच्या हातामध्ये हे फळ देवीने धारण केले आहे. कोल्हापूरची अंबाबाई म्हणजेच आदिशक्‍ती. तिच्या उजव्या हातात हे फळ धारण केलेले असून धर्मशास्त्राप्रमाणे या फळाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले असल्याचे दिसून येते.
हर्बल गूळ तयार करताना यामध्ये महाळुंग वनस्पतींच्या पानांचा उपयोग केला जातो.
महाळुंग ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. ही लिंबू वर्गात मोडणारी मूळ वनस्पती आहे. या वनस्पतीची नावे  प्रामुख्याने  - म्हाळुंग , बीजपूरक , मातुलुंग , बिजाहृ , फलपुरक, अम्ल-केसर  , बीजपूरक , सुमनःफल   इ. प्राचीन काळापासून प्रचलित आहेत .
महाळुंग हे फळ लहान असताना पित्त , कफ यासाठी जास्त उपयोगी .
मध्यम आकाराचे असताना विविध आजारांवर उपयोगी तर पूर्ण पिकलेले , रंग प्राप्त झालेले हे फळ हृदयासाठी उपयोगी असून पोषण करून ताकद वाढवते.
Back to content